Sakal Idol of Maharashtra - AWAREDS REAL ESTATE ICON | Saidham Builders & Developers

बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्समधील नावाजलेले नाव साईधाम बिल्डर्स, नागपुर, 
Article by Sakal News Paper, 13.12.2022

 अंगी जिद्द आणि चिकाटी असली की जे ठरवले आहे ते नक्कीच मिळविता येते, हीच बाब साईधाम बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स म्हणून नावलौकिक मिळविले ले अमोल विश्वनाथराव वैराळे यांनी सिद्ध केली. स्वतःच्या मालकीच्या हॉटेल व्यवसायात अमोल यांचे मन रमत नव्हते. उत्तम मिळकतीसाठी काहीतरी वेगळे करावे असे त्यांना मनोमन वाटायचे. हॉटेलमध्ये काउंटर सांभाळत असताना तिथे तासनतास बसणारे बिल्डर्स क्षेत्रातील व्यक्ती, त्यांचे बोलणे ऐकून मेहनत केली तर या क्षेत्रात पैशाला काही कमी नाही, ही बाब अमोल यांच्या लक्षात आली आणि त्यादृष्टीने त्यांनी वाटचाल सुरू केली. अल्पावधीतच त्यांना व्यवसायात यश आले . उत्तरोत्तर त्यांच्या प्रगतीचा आलेखउं चावत गेला. आज नागपुरातील चिंचभवन, हुडकेश्वर, मानेवाडा, चिखली, खापरी, जामठा, विहीरगाव, उमरगाव आणि वर्धा जिल्ह्यातील जांब या ठिकाणी त्यांचे ले -आऊट्स आहेत. राहण्याच्या दृष्टीने योग्य असले ल्या ठिकाणी ले -आऊट टाकायचे, हा नियम त्यांनी स्वतःला घालून दिला आहे . ज्याचे ते कटाक्षाने पालन करतात.

 मूळचे अमरावती जिल्ह्यातील असलेले अमोल वैराळे यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण अमरावतीला घेतले. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यामुळे त्यांनी शेतीशी जुळलेली
नाळ तुटू दिली नाही. उत्तम पद्धतीने शेती करणारे सधन कास्तकार अशी विश्वनाथराव वैराळे यांची पंचक्रोशीत ख्याती आहे. वडील, मामा शेती आणि शेतमाल खरेदीविक्री व्यवसायात तरबेज असल्याने तेच गुण अमोल यांच्यात उतरले. त्यांनाही सुरुवातीपासून व्यवसायाची आवड होती. त्यादृष्टीने मार्गक्रमण करीत त्यांनी बी.कॉमचे शिक्षण घेत पुढे हॉटेल मॅनेजमेंट केले. पण, त्यात मन रमले नाही आणि २००५-०६ मध्ये त्यांनी साईधाम नावाने बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सच्या क्षेत्रात पदार्पण केले. नावाजलेल्या या क्षेत्रात पाय रोवणे साधे काम नव्हते; परंतु हार मानायची नाही हा चंगच त्यांनी मनाशी बांधला होता. व्यवसायात जिद्दीने मार्गक्रमण करीत असताना त्यांनी प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत केली.

👉 | एमएमआरडीए आल्याने सर्वाधिक आनंद
एमएमआरडीए आल्याने प्लॉट विक्री आणि खरेदीत पारदर्शकता आल्याचे सांगत यामुळे ग्राहकांना सहज कर्ज मिळते. ग्राहकांना डेव्हलपमेंटही लवकर मिळत असल्याने बिल्डरचे काम सोपे होते. पूर्वी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या क्षेत्रात अनेक टेक्निकल बाबी
होत्या. सेल डीड पुण्यावरून व्हायच्या. एक प्लॉट तीन-चार जणांना विकण्याचा धोका व्हायचा. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्लॉट खरेदी करण्यासाठी पुढाकार घेत नव्हते. परंतु आता सातबाराची लिंक थेट रजिस्टार कार्यालयात असल्याने प्लॉटविक्रीत पारदर्शकता आली. रेरा आला तेव्हापासून प्लॉट विक्री आणि खरेदीतील नियम अतिशय कडक झाले आहेत. परंतु एमएमआरडीएमुळे सर्वसामान्यांचे प्लॉटचे स्वप्न साकार झाल्याचे वैराळे सांगतात.

नागपूर, मंगळवार,
१३ डिसेंबर २०२२

👉 | पारदर्शी व्यवहारातून जुळविले ग्राहक
नागरिकांचे हित लक्षात घेऊन अमोल यांनी या व्यवसायात पदार्पण केले. त्यामुळेअल्पावधीत त्यांनी तब्बल दोन हजार ग्राहक जोडले. नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील ग्राहकांना त्यांनी प्लॉट विकले. सर्वाधिक ग्राहक चंद्रपूर, वणी, वरोरा, बल्लारशा येथील असल्याचे ते सांगतात. कन्स्ट्रक्शन व्यवसायात सध्या जायची इच्छा नसल्याचे सांगत चांगली संधी मिळाली तर चान्स घेईल अन्यथा आपलाच व्यवसाय बरा असल्याचे ते सांगतात. या व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. एकदा तो संपादन केला तर तुमचे यश कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. असे अमोल सांगतात. साईधामच्या यशाचे श्रेय ते त्यांच्या संपूर्ण टीमला देतात.

👉 | कुटु बं ीयांकडू न सतत प्रोत्साहन

वडील शेतकरी असले तरी त्यांनी अमोल यांना व्यवसायासाठी नेहमी प्रोत्साहित केले. आईसुद्धा सदैव त्यांच्या पाठीशी असते. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात पत्नी भारती यांनी त्यांना कामात मदत केली. पुढे संसारवेलीवर तन्मई आणि साई ही दोन फुले उमलल्याने भारती यांनी कुटुंबाला प्राधान्य देत मुलींकडे लक्ष देण्याला प्राथमिकता दिली. व्यवसायाचा संपूर्ण डोलारा अमोल सहकारी संदीप हेटे यांच्या सोबतीने सांभाळत आहेत. त्यांच्या ले-आऊटचे नाव साईनगरी असून, साईनगरी १ पासून सुरू झालेला प्रवास साईनगरी ६ आणि ७ पर्यंत पोहोचला असल्याचे अमोल सांगतात.


"सध्या प्लॉट खरेदी-विक्रीला अच्छे दिन आहेत. परंतु प्लॉटविक्री करताना सॅक्शन असल्याशिवाय प्लॉटची विक्री करू नये. राज्य शासनाच्या
नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रत्येकाने खरेदीविक्री करावी. ले-आऊट खरेदी-विक्रीच्या व्यवसायात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. ग्राहकांना विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यास प्रत्येक व्यवसायात यश आहे. मी साईबाबांचा भक्त असल्याने माझ्या फर्मचे नाव साईधाम बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स ठेवले व प्रोजेक्टचे नाव ‘साई नगरी.’ साईबाबांच्या कृपेने आतापर्यंत मार्ग मोकळे होत गेले. प्रत्येक ले-आऊटमध्ये साईबाबांचे मंदिर बांधण्यात यश येवो, हीच प्रभूचरणी प्रार्थना."

-अमोल वैराळे, साईधाम बिल्डर्स ॲन्ड लॅन्ड
डेव्हलपर्स, अजनी चौक, नागपूर

👉 | सर्वच ले -आऊट रहिवासी भागात 

नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या अमोल यांचे सर्वच ले-आऊट विकसित भागात आहेत. कोणतीही जमीन खरेदी करताना आपण त्या
ठिकाणी आपले घर बांधू शकतो का, हा विचार मी खुद्द करतो आणि उत्तर हो असेल तरच तिथे प्लॉट टाकले जातात. रहिवासी भागापासून अगदी जवळ असलेल्या भागाची निवड करतो. जेणेकरून प्लॉट घेणाऱ्यांना सोयीचे व्हावे, असे अमोल सांगतात. आपल्या ७० टक्के ले-आऊटमध्ये घरे बनली आहेत. चिखली येथील सर्वात पहिल्या ले-आऊटमध्ये ९० टक्के घरे बनली आहेत. जांब येथील ले-आऊटमध्ये स्थानिकांच्या मागणीनुसार ओपन स्पेसमध्ये साईमंदिर बांधले. एवढेच नव्हे तर सरपंचाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. प्रामाणिक प्रयत्नांमुळे व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती होत गेली, हे सांगण्यासही ते विसरत नाहीत.

👉 | नागपूरचा चौफेर विकास
वैराळे यांचे वर्धा मार्गावर सर्वाधिक ले-आऊटस असले तरी उमरेड आणि हुडकेश्वर मार्गही विकासाच्या दृष्टीने
उत्तम असल्याचे ते सांगतात. ४० वर्षांपासून नागपुरात प्लॉटविक्रीला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करून आपल्या आवडीच्या मार्गाला पसंती देत प्लॉटखरेदी करतो. प्लॉट खरेदी करताना नागपूरपासून किती अंतरावर आहे यापेक्षा प्लॉटपासून वस्ती किती अंतरावर
आहे हे पाहिले जाते. प्लॉट विकणारी सोसायटी ॲक्टिव्ह असेल तर ग्राहकांचे कधीच नुकसान होणार नाही, असेही वैराळे सांगतात.

Article by Sakal News Paper, 13.12.2022